परंडा, दि. 08 : सागर मोहन जाधव, रा. खासापुरी चौक परंडा यांनी दि. 03.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 3102 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर जाधव यांनी दि. 07.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर, दि. 8 : गौस रहीमतुल्ला शेख व्यवसाय- बांधकाम मिस्तरी, रा. शांताई रेसीडन्सी, तुळजापूर यांनी दि. 12.08.2020 रोजी राहत असलेल्या ठिकाणी बांधकामावर आपल्या भावाचा विवो वाय- 83 मोबाईल फोन व मित्राचा ओप्पो ए- 37 एफ मोबाईल फोन चार्जींगला लावले होते. ते दोन्ही मोबाईल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गौस शेख यांनी दि. 08.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top