उस्मानाबाद, दि. 08 : उस्मानाबाद जिल्हयात आज मंगळवार दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 226 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 248 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 397 झाली आहे. यातील 4 हजार 748 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 216 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 433 जणांवर उपचार सुरु आहे.









 
Top