उस्मानाबाद, दि. 8 : दि. 07.09.2020 रोजी उस्मानाबाद शहरात अतिक्रमण हटाव मोहिम चालू असतांना 1) रईस बागवान 2) जावेद बागवान, दोघे रा. समर्थ नगर, उस्मानाबाद 3) हरीभाऊ पेटे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी शहरातील प्रेस्टीज हॉटेल समोरील फुटपाथवर अतिक्रमणत असलेल्या आपापल्या दुकानांसमोरील डांबरी रस्त्यावर मुरुम टाकुन सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले. यावरुन लोकसेवक- विलास गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम- 3 अन्वये दि. 07.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.