उस्माबानाद, दि. 08 : कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई ओदश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन 1)सुशिल उपळकर 2) विराट भातलवंडे 3) प्रशांत चव्हाण, तीघे रा. दहिफळ 4) मारुती गुंड 5) ज्ञानेश्वर माने, दोघे रा. पाडोळी 6) सचिन शिंदे, रा. तुळजापूर 7) सचिन भराटे, रा. पारा 8) कृष्णा बिक्कड, फक्राबाद, ता. केज 9) रंजीत आडे, रा. आंदोरा 10) किरण मस्के, रा. गोविंदपुर 11) अजय साकडे, रा. नायगाव यांनी दि. 07.09.2020 रोजी 13.30 वा. सु. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विनापरवाना, नियमबाह्य आंदोलन केले. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोउपनि- श्री सदानंद भुजबळ यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 11 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 271 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 
Top