उस्मानाबाद, दि. 6 : सविता बलवंत चव्हाण, रा. मधला तांडा, मौजे जहागीरदारवाडी, ता. उस्मानाबाद या दागिने व वाहनखरेदीसाठी माहेरहुन पैसे आनत नव्हत्या. याचा राग सासरकडील 1)बलवंत देवीचंद चव्हाण (पती) 2) सुवर्णा चव्हाण (सासु) 3) देवीचंद चव्हाण (सासरा) 4) सुहास चव्हाण (दिर), चौघे रा. अंबेजवळगा तांडा, ता. उस्मानाबाद 5) पुजा श्रीकांत राठोड, रा. जहागीरदारवाडी तांडा यांना होता. यावर त्यांनी संगणमताने सन- 2018 पासुन सविता यांचा सासरी- अंबेजवळगा येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच माहेरी- जहागीरदारीवाडी मधला तांडा येथे येउन पैसे व दागिने न आनल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सविता यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 05.09.2020 रोजी नोंदवला आहे.
