तुळजापूर, दि. 6 : बब्रु सितोळे भोसले, वय 55 वर्षे, रा. वेताळनगर, तुळजापूर हे दि. 29.08.2020 रोजी 21.45 वा. सु. तुळजापूर घाटामध्ये तुळजापूर- सोलापूर रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 2763 च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून बब्रु भोसले यांना धडक दिली. या अपघातात बब्रु भोसले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत मोटारसायकल चालक घटनास्थळावरून पसार झाला. अशा मजकुराच्या राजा बब्रु भोसले (मयताचा मुलगा) यांनी दि. 05.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम, दि. 6 : ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एच 3309 च्या अज्ञात चालकाने दि. 31.08.2020 रोजी 22.00 वा. सु. मौजे भासगा शिवारात ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून पायी चालत जाणाऱ्या शैलेश महादेव कागे, रा. भोसगा, ता. लोहारा यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या शैलेश कागे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 05.09.2020 रोजी नोंदवला आहे.
