तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात टीपीओ अंतर्गत नुकत्याच ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आल्या. या ऑनलाइन इंटरव्यूमध्ये महाविद्यालयातील 29 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांची कंपनीच्या वतीने स्किल टेस्ट घेण्यात आली. यातून संगणक शाखेतील स्नेहल पाटील या विद्यार्थिनीची पुणे येथील टेकयुर टेक्नॉलॉजी या कंपनीत संगणक अभियंता म्हणून अडीच लाख रुपये पॅकेजवर निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांनीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे , टीपीओ विभाग प्रमुख प्रा. छाया घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहल पाटीलच्या निवडीबद्दल मंदिर व्यवस्थापक तहसीलदार, महाविद्यालयाचे प्राचार्य ,उपप्राचार्य, विभाग प्रमुख,ग्रंथपाल, प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
