जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे हॅलो मेडिकल फाउंडेशन, अणदूर व ग्रामपंचायत, आलियाबाद यांच्या वतीने कोरोना विषयी माहिती परिपत्रकाद्वारे प्रसिद्धी करण्यात आली.या परिपत्रकाचे वाटप संरपच व प्रमुख महिला यांच्या हस्ते करण्यात आले .या मध्ये जनतेस आवाहन करण्यात आले आहे की ,आपल्या परिसरातील व्यक्ती विदेशातून आपल्या घरी परत आले असल्यास त्याची सुचना प्रशासनास देऊन सहकार्य करावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.आपणास सर्दी, खोकला,ताप, सदृश्य आजाराची लागण झाल्यास त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी.असेआवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संरपच सौ.ज्योतिका चव्हाण, ग्रा.प. सदस्या रेखा चव्हाण, महिला बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री चव्हाण, शांताबाई चव्हाण,रेषमा चव्हाण, सविता राठोड,आशा कार्यकर्ती रिषा राठोड, हॅलो फाउंडेशनच्या प्रेरिका रिना चव्हाण,हरीदास राठोड आदि उपस्थित होते.
