उस्मानाबाद, दि. 23 : उस्मानाबाद जिल्ह्ययातील प्रेमीयुगूल प्रेमविवाह करण्यासाठी बेंगलोरला घरातुन पळून जात असताना वाटेत कार व ट्रकच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  यातील अपघातग्रस्त कार बार्शीतली असून मृतामध्ये एक बार्शीतील तर एक येरमाळ्याचा तर दोघे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवाशी आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबची मुलगी, येरमाळ्याचा मुलगा, बार्शीतील कारचालक प्रदीप बनसोडे, त्याचा मित्र संदीप कांबळे या कारमधील चौघांना वाळूच्या ट्रकने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन मुलगी उपचार चालू असताना सोमवारी मयत झाल्याची घटना घडली.

यातील मयत प्रदीप बनसोडे हा संभाजी नगर, बार्शी येथील रहिवाशी असून आपल्या कारमधून भाड्याने प्रवाशी वाहतूक करत असे.  मयत झालेला त्याचा मित्र संदीप कांबळे याने त्यास कळंब तालुक्यातून बंगलोरला जाण्याचे भाडे आणले होते. त्यात एक युवक व सोबत अल्पवयीन मुलीला बेंगलोर येथे प्रेमविवाहासाठी जाण्यासाठी भाडे त्यांनी स्वीकारले होते. प्रवास लांबचा असल्याने तो मयत संदीप हाही बदली चालक म्हणून बनसोडे यांच्यासोबत गेला होता. मात्र काळाने या चौघांवर झडप घातल्याने त्यांना आपला प्राण गमवावा लागला.


 
Top