नळदुर्ग : एस.के.गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथील गावाला विद्दूत पुरवठा करणरा मुख्य डीपी सतत जळाल्याने सरपंच परेशान, लाईनमेन हैराण तर गावची जनता चाचपडते अंधारानं अशी त्रिधा अवस्था झाली आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी गावाला विद्दूत पुरवठा करणारा मुख्य डीपी जळाला असता लगेच सरपंचाला जनते कडून फोनवरू विचारणा सुरू झाली. त्यामुळे सरपंच परेशान ,सरपंचासह ग्रामस्थांकडून संबंधित लाईन मेनला फोन त्यामुळे ते हैराण तर विद्दूत महावितरण कंपनीच्या नळदुर्ग ता.तुळजापूर कार्यालयातील कर्मचारी व आधिकारी यांच्या बेजबाबदार वर्तनाने गावची जनता तिनदिसापासून चाचपडते अंधारान.अशा त्रिधाआवस्थेत सापडलेल्या वागदरीकराना विद्दूत पुरवठा बंदझाल्याने अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे.विषेशतः मोबाईल धारकांची मोठी तारांबळ उडाली आहे. मोबाईल बँटरी रिजार्ज करण्यासाठी अनेक ठिकाणी धावपळ करवी लागत आहे. शेजारच्या गावात जावून, शेतकऱ्यांच्या शेतात जावून विद्दूत मोटारीच्या विज कनेक्शन चा उपयोग करून मोबाईल बँटरी रिजार्ज करून आपला संपर्क ठेवत आहेत.गावा जवळच्या शेकऱ्याच्या डीपी वरुन विद्दूत कनेक्शन घेऊन तात्पुरती पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. बाकी पिटाची गिरणी बंद असल्याने दळणसाठी नळदुर्ग, खुदावाडी, दहीटणा,गुजनूर आदी गावात जावून दळण दळून आणावे लागत आहे.
फंखा, फ्रिज, टी.व्ही.बंद आहे. सध्या आयपीएल च्या क्रिकेट मँच चालू आहे. पण टि.व्हीचं बंद असल्याने तरुणांची मोठी निरशा होत आहे. दुधाची भूक ताकावर भागवावी तसे मोबाईलवर मँचचा आनंद घ्यावा लागत आहे.
यापूर्वीही पंधरा दिवसा आगोदर हा डीपी जळाला होता .तेंव्हा नविन डीपी बसविण्यात आला होता .तो कदाचित निक्रष्ठ दर्जाचा असावा करण पंधरा दिवसातच तो दोनदा जळाला. याचे जरा सुध्दा भान संबंधित विद्दूत कर्मचाऱी व आधिकारी याना नाही.गाव जळो हणूमान बहार म्हटल्याप्रमाने.विद्दूत आभियंत्याना याचे काही देणे घेणे नाही.तरी आता वरिष्ठाधिकारी यांनी या कडे लक्ष देऊन चांगल्या दर्जाचा अधिक पाँवरचा डीपी वागदरी येथे बसवून येथील कायमस्वरूपी विद्दूत पुरवठयाचा प्रश्न मिटवावा असी जनतेतून मागणी केली जाते आहे.
