जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर शाळेत १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये व सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी चालू असलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा ,भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी घरातूनच भाषणाचा व्हिडिओ , रांगोळी, निबंध लेखणाचा फोटो व काढलेले चित्र व्हाट्सअप ग्रुप वर पाठवून दिले. त्यातून प्रत्येक स्पर्धेतून गुणानुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
रांगोळी स्पर्धेत कु. पुनम चौगुले (इयत्ता सातवी प्रथम क्रमांक), कु. सानिका दरेकर( इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक), कु. प्रतीक्षा भोगे (इयत्ता चौथी तृतीय क्रमांक), भाषण स्पर्धेमध्ये कु. संध्याराणी संजय अंगुले( इयत्ता सातवी प्रथम क्रमांक), कु. अंजली मिलिंद डावरे (इयत्ता सहावी द्वितीय क्रमांक), कु. कृष्णा गोविंद घोरपडे( इयत्ता सातवी तृतीय क्रमांक), तर निबंध स्पर्धेत कु. कुणाल कदम (इयत्ता सहावी प्रथम क्रमांक), कु. विवेक पिसे( इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक), कु. प्रियंका स्वन्ने (इयत्ता सातवी तृतीय क्रमांक), चित्रकला स्पर्धेत कु. साक्षी कांबळे (इयत्ता सहावी प्रथम क्रमांक), कु. स्विटी अंगुले (इयत्ता सातवी द्वितीय क्रमांक), कु .साक्षी स्वामी( इयत्ता सहावी तृतीय क्रमांक).
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मोरे, सदस्य शकील मुलानी, तुकाराम कुंभार, मुख्याध्यापक रेणुके डी.एस. व शाळेतील शिक्षकांनी अभिनंदन केले. कोरोनाचा प्रभाव कमी होताच यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल असे मुख्याध्यापकानी जाहीर केले. राबवलेल्या उपक्रमाचे जळकोट बीट शिक्षण विस्तार अधिकारी सर्जे जी.एन., केंद्रप्रमुख श्री. अंगुले अरुण व पालकांनी कौतुक केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. रेणुके एम. एस. यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे नियोजन व आयोजन सहशिक्षक सोनवणे डी.एन. यांनी केले.