जळकोट : मेघराज किलजे
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मा यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला.
विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन नागनाथ पांचाळ व दत्तात्रय पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार मेघराज किलजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विकास चव्हाण, शिवराज राचेट्टी, सुनील पांचाळ, अनिल पांचाळ, विठ्ठल पांचाळ, महेश सुतार, अरुण पांचाळ, विनोद पांचाळ, मारुती सुतार,बाळु पांचाळ आदीजण उपस्थित होते.