कळंब, दि. 18 : तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतच्या प्रशासक पदी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या येरमाळा विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती बोरफळकर ए. बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामा दिनानिमित्त ध्वजारोहण प्रशासक श्रीमती बोरफळकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक, मावळत्या सरपंच व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित असतानाही सोशल डिस्टंसिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले.
कार्यभार स्वीकारताच श्रीमती बोरफळकर यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली व महाराष्ट्र शासनाने त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोरोना प्रतिबंधासाठी तातडीची उपाययोजना म्हणून "माझे कुटुंब ,माझी जबाबदारी" याविषयी माहिती देऊन कार्यास सुरुवात केली. आशा कार्यकर्ती व अंगणवाडी कार्यकर्ते यांना गावातील लोकांची गावातील जनतेची आरोग्य तपासणी करण्यासाठी आवश्यक सोयी सोयी साधनांची उपलब्धता असल्याचे जाणून घेतले. त्याच प्रमाणे अल्पावधीत सर्व ग्रामस्थांचे आरोग्य तपासणी करण्यात येऊन परगावाहून येणाऱ्या लोकांची वेगळी सूची तयार करून त्यांचीही आरोग्य तपासणी वेळोवेळी केली जाणार आहे. त्याचबरोबर पूर्ण गावातील मूलभूत सोयी आणि विविध योजना मार्फत करण्यात आलेली कामे, निकडीची व गरजेचे असलेली कामे याचा आढावा घेतला. प्रशासकांनी उचललेल्या पावलामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.