जळकोट : मेघराज किलजे
सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. या महामारीचा मुकाबला करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामस्तरावर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. सदरील मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. जळकोट गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने या मोहिमेचा मराठवाडा मुक्ती दिना दिवशी शुभारंभ करण्यात आला.
कोरोना संकट वरचेवर वाढत आहे. याचा समूळ नायनाट होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कोरोना महामारी संदर्भात जनजागृती करण्यात येणार असून, सर्व कुटुंबाचे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जळकोट गावात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. सुनिता पाटील यांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने आरोग्य तपासणी करून करण्यात आला.
या मोहीम शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील, कुलस्वामिनी सूतगिरणीचे संचालक महेश कदम, जळकोट ग्रामपंचायतीचे नूतन प्रशासक एस.बी. तांबोळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू सातपुते, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, माजी पंचायत समिती सदस्य अर्जून कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र कदम, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर वाडीकर, वसंतराव पाटील, समाधान पाटील , शिवराम कदम आदीसह गावातील लोक प्रतिनिधी, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, युवक उपस्थित होते.