जळकोट : मेघराज किलजे
गुंजोटी येथील वीरशैव कक्कय्या (ढोर) समाजाची गुरुवार रोजी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत एकमताने ठराव मंजूर करून नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष पदी किशोर व्हटकर, उपाध्यक्ष सत्यप्रकाश इंगळे, सचिव आकाश कटकधोंड, सहसचिव मनीष कटकधोंड, खजिनदार तुळशीराम कटकधोंड, संघटक जटिंगा इंगळे, उज्वल कटकधोंड, राम कटकधोंड, विष्णू कटकधोंड, दत्ता शिंदे, सल्लागार दत्तू कटकधोंड, राजेंद्र कटकधोंड, दत्ता कटकधोंड, खंडू कटकधोंड, महेश नारायणकर यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.