तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील खंडाळा येथील शेतकऱ्यांना पाच टक्के निबोंळी आर्क हे कोणत्याही पिकावरील किडीसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकावर कशा पद्धतीने करावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अतंर्गत तुळजापुर येथील रत्नाई कृषी महाविद्यालय अकलुज या महाविद्यालयाची विद्यार्थीनी, तथा कृषी कन्या श्रुती धनंजय पाटील हिने आपल्या शिक्षण वर्ष स.न.२०२० ते सन.२०२१ या कालावधीच्या काळात पाच टक्के निबोंळी अर्क कसे बनवायचे व निबोंळी अर्कचा वापर विविध पिकावर कशा पद्धतीने करावा याचे बळीराजा शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखविले.
महाविद्यालयाचे प्रा.डी.पी.बरकडे ,डाँ वाय.टी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना यशस्वीपणे करुन दाखविले.निबोंळी आर्क कशा पद्धतीने तयार करावा या साठी लागणारे साहित्य व त्याचे प्रमाण किती द्यावे या बाबतही बळीराजा शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.कडु निबांच्या बिया मध्ये असलेले अज्ञाडिक्टिन पिकावर किटक नाशकाचे काम करते त्यामुळे याचा वापर सर्व प्रकारच्या पिकावर १५ दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी घेतल्यास किडीच्या जिवन चक्रात अडथळा येऊन किडीवर नियंत्रण होते तसेच ५ टक्के निबोंळी अर्क फवारल्याने मावा अमेरिकन बोंड आळ्या तुड तुडे पाने पोखरणारी अळी ,फळमाशी ,खोड किडा आदी अनेक किडीवर याचा प्रभाव पडतो.
यावेळी जयसिंह मोहितेपाटील,महाविद्यालयाचे समन्वयक डाँ डी.पी.कोरटकर ,प्राचार्य आर. जी.नलवडे कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.एकतपुरे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस आर.अडत,डाँ.डी.एम ठवरे,प्रा.डी.एस मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.