तुळजापूर, दि. 09 : दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाने जे आमली पदार्थ विकले जात आहे. त्यांच्यावर बंदी आणावी याबाबतचे निवेदन अखिल भारतीय छावा मराठा संघटना उस्मानाबाद यांच्याच्यावतीने तुळजापूर तहसिलदार यांना देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज यांच्या नावाने शिवाजी बिडी व संभाजी बिडी हे सर्रासपणे विकली जात आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजे संभाजी महाराज यांच्या नावाचा व फोटोचा उपयोग करून आमली पदार्थ विकले जात आहे. हे चुकीचे असून त्या कंपनीवर कारवाई करावी जे ने करून ते नाव टाकणार नाही. तसे जर नाही झाले तर अखिल भारतीय छावा मराठा संघटना आंदोलन करून ते कारखाने बंद केल्याशिवाय राहणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे. 

यावेळी अखिल भारतीय छावा मराठा संघटना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष दिनेश रोचकरी, उपजिल्हाध्यक्ष विजय माने, शहर अध्यक्ष आण्णासाहेब इंगळे, ऋषीकेश शिंदे, राहुल साळवे, महेश शेळके, अतुल चौधरी, गणेश जाधव सह छावा पदधिकारी व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top