तुळजापुर, दि. 6 : येथील मल्लीकार्जुन (आण्णा) लिंबाजी नाईक(गवळी) वय वर्षे ५९ हे दि. ६ रविवार रोजी घरा जवळील रावळ गल्लीतील मारुती मंदीरा जवळ बसले होते\  दुपारी १२/३० दरम्यान अचानक चक्कर आल्याने खाली कोसळले. त्यामुळे डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने रुग्नालयात नेण्यात आले. मात्र  उपचारापुर्वीच त्यांचे दुखद निधन झाले.त्यामुळे त्यांच्या परिवारा वर मोठा दुखाचा डोंगर कोसळला.

या निधनाची बातमी शहरात कळताच शहरात हळ हळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्छात पत्नी, तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांच्यावर रविवारी सायंकाळी तुळजापुर (खुर्द) रोडवरील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

 
Top