नळदुर्ग, दि. 28 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून दि. १५ सप्टेंबरपासून महाराष्ट्र शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'ही मोहिम राबविण्यात सुरूवात केली असून या मोहिमेस नळदुर्ग येथे दि. 23 पासुन सुरुवात करण्यात आली. या मोहीमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेंतर्गत नळदुर्ग शहरात आतापर्यंत 1 हजार 204 कुटूंब तर 5 हजार 940 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. आठ प्रभागामध्ये आठ पथक नियुक्त केले असून नगरपालिकेचे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांचा पथकात समावेश आहे.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पथक घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे काम जोमाने करीत आहेत.


 
Top