उस्मानाबाद, दि. 28 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 211 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 104 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 766 झाली आहे. यातील 9 हजार 139 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 356 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 271 जणांवर उपचार सुरु आहे.




