नळदुर्ग, दि. 28 : जेष्ठ विचारवंत, व्याख्याते, पंढरपूचे माजी नगराध्यक्ष, हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक, भागवताचार्य वा.ना. उत्पात महाराज यांना नळदुर्ग येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा ना उत्पात यांचे करोना संसर्गामुळे पुण्यात उपचारदरम्यान आज निधन झाले. वा.ना. उत्पात महाराज हे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. तसेच ते 25 वर्ष नगरसेवक म्हणून ही काम केले आहेत. स्वा. सावरकरांचे विचारानी प्रेरित होऊन आयुष्यभर महाराष्ट्र भर व्याख्याने केली. ते हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभासक होते. रुक्मिणी मातेचे मुख्य पुजारीही होते. भागवताचार्य वा.ना.उत्पात महाराज यांच्या जाण्याने महाराष्ट्रच नव्हे तर देश पोरका झाला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक विनायक अहंकारी, मनसेचे सरचिटणीस व स्वा. सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, प्रशांत जोशी, संतोष नाईक, सोनू गवळी, मयूर जोशी, आदित्य कुलकर्णी, सूरज जोशी, अजय मोरे,गोटू कुलकर्णी आदीजण उपस्थित होते.
