✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 29 सप्टेंबर 2020

🎯
ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा - www.tuljapurlive.in
-----------------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक* 📱 *8668973422*
_____________
🔆 उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठी बेंगळुरुच्या नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून क्लाऊड फिजिशियन टेलिमेडीसिनचा उपक्रम राबविण्यात येणार, मृत्यू दर कमी करण्यासाठी पुढाकार, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती...

🔆 उस्मानाबाद : कोविडच्या पार्श्वभूमीवर तात्काळ तपासणीसाठी रामनगरात नागरी आरोग्य केंद्रात अॅन्टीजेन टेस्टची केलेली सुविधा अपुरी, या केंद्रास दररोज केवळ २५ कीट उपलब्ध, त्या अपुऱ्या पडत असल्याने कीटसची संख्या वाढविण्याची मागणी...

🔆 तुळजापुर : शहरातील जनता कर्फ्यू शिथील आजपासुन शिथील, व्यापा-यांच्या मागणीवरुन नगरपरिषदेचा निर्णय...

🔆 तुळजापूर : दि. 9 ऑक्टोबर रोजी तुळजापुरात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पुर्वतयारीसाठी सकल मराठा समाजाची आज तुळजापुरात बैठक...

🔆 उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत लवकरच तुळजाभवानी रुग्णालयाचे 50 खाटांचे रुग्णालय, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय...

🔆 नळदुर्ग : स्वस्त धान्य दुकानांतुन सप्टेंबर महिन्याचे दिलेले धान्य दर्जाहीन; सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांतुन संताप, पुरवठा अधिका-यांनी चौकशी करण्याची मागणी...

🔆 नळदुर्ग : श्री क्षेत्र तुळजापुर व नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करण्यात येणा-या कुरनूर मध्यमक (बोरी धरण) प्रकल्प तुडूंब भरुन सांडवे वाहू लागले...

🔆 उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी शेतक-यांना अनुदान व पिक विमा देण्याची भाजपाची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी...

🔆 परंडा : दोन दुकानात छापा टाकुन ८२ हजार रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त; स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई...

🔆 उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयातील हुतात्मा वेदप्रकाश यांच्या स्मृतिस्तंभाच्या कामाचे भुमीपूजन...

🔆 उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेचे आज जिल्हाभर आंदोलन; दिवसभर काळ्या फिती लावून करणार कामकाज...

🔆 तुळजापूर : रस्त्यावर विनाकारण फिरणा-या दुचाकीस्वारावर पोलीसांकडुन दंडात्मक कारवाई
_____________
*आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422*
*फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------

 
Top