नळदुर्ग : विकास नाईक
येथिल भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य नर-मादी हा धबधबा मंगळवार रोजी पासून सुरू झाला आहे. गेल्या आठवडा भरात झालेल्या पावसामुळे झोडपुन काढल्याने तिर्थक्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा होणारा बोरी धरण पुर्णक्षमतेने भरून सांडवे सुरू झाल्याने हा धबधबा सुरू झाला आहे. माञ सध्या कोरोना मुळे हा किल्ला पर्यटनासाठी बंद असल्याने पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंद आहे.
सोलापूर येथील युनिटी मल्टिकाँन्स कंपनीने पुरातत्व खात्याशी सामंजस्य करार करून किल्ल्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. यामुळे किल्ला परिसर आधिकच सुशोभित झाला आहे. किल्ल्यात इ. स. १३ व्या शतकात तत्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे बांधून नदीचे पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने बोरी नदीलाही चांगलेच पाणी आले आहे. शिवाय बोरी धरण ही पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे मंगळवार पासून नर-मादी धबधब्यातून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. माञ कोरोणामुळें यंदा हा नरमादी धबधबा बघता येणार नाही.
नळदुर्ग शहराच्या उत्तर बाजूने वाहत येणारी बोरी नदी किल्लयाचा आत येऊन तिला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविली आहे. पूर्व-पश्चिम असा हा बंधारा अतिशय कल्पकतेने परंतु भक्कम अशा तर्हेने बांधलेला आहे. बंधार्याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडवंना नर व मादी अशी नावे देण्यात आलेली आहेत. नर-मादी धबधबतील पाणी पुढे 100 फूटापेक्षा अधिक खाली खोल जाऊन आदळते. ते सुंदर व विहंगम दृश्य पाहताना अक्षरश: डोळ्यांचे पारणे फिटते.
व्हिडिओ पहा -
