नळदुर्ग, दि. 07 : येथील उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामासाठी 6 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान बांधकाम करणे कामासाठी मंजुरी मिळालेली असून काम प्रगतीपथावर अंतिम टप्यात आहे. परंतु मागील दोन वर्षापासून इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने काम ठप्प आहे. जिल्ह्यामध्ये सध्‍या कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या ठिाकणच्या इमारती ताब्यात घेतल्या जात आहेत. परंतु उमरगा, सोलापूर, राष्ट्रीय महामार्गावरील प्रगतीत असलेल्या या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाटी निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. नळदुर्ग शहराशी दररोज 60 पेक्षा  आधिक गावांचा दररोजचा संपर्क आहे. शिवाय राष्ट्रीय महामार्गावरील हे मध्य ठिकाण आहे. 

कोव्हीड-19 चा मुकाबला करण्यासाठी या रुग्णालयाचा खूप मोठा फायदा या भागातील रुग्णांना होणार आहे. तरी ग्रामीण रुग्णालय, नळदुर्ग ता. तुळजापूर या इमारत बांधकामासाठी रु. 6 कोटी प्राधान्य क्रमाने उपलब्ध करुन ‍ देण्याची मागणी  चव्हाण यांनी केली आहे.

 
Top