तुळजापूर, दि. 07 : येथील श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असलेले अनिल धोत्रे यांना अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार गौरव जाहीर झाला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहराध्यक्ष धर्मराज यांच्या हस्ते धोत्रे यांचा स्त्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षण अधिकारी जाधव, विस्तार अधिकारी धुरगुडे, माळी, माने, कुलस्वामिनी विद्यालयचे मुख्याध्यापक सोनटक्के, मनविसेचे जिल्हा सचिव सुरज कोठावळे, शहर सचिव वेदकुमार पेंदे , पत्रकार राहुल कोळी, ज्ञानेश्वर गवळी यांच्यासह शिक्षक, मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.