नळदुर्ग : एस.के. गायकवाड
राज्यस्तरिय कोव्हिड-१९ प्रबोधन आवार्ड स्पर्धा २०२० साठी नळदुर्ग ता. तुळजापूर येथील विश्वजीत अंबादास वाघमारे याची निवड झाली आहे.
यूनिस्को क्लब न्यू दिल्ली व यूनिस्को स्कूल क्लब महाराष्ट्र च्या वतीने औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या कोव्हिड-१९ प्रबोधनपर आधारित पोस्टर, बँनर राज्यस्तरिय चित्रकला स्पर्धेत निवड करण्याकरिता नुकतेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मूळ नळदुर्ग ता .तुळजापूर येथील रहिवासी असलेला व सध्या श्री तुळजाभवानी विद्यामंदिर ता. मावळ, जि. पुणे येथे शिक्षण घेत असलेला शालेय विद्यार्थी विश्वजित अंबादास वाघमारे यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याची राज्यस्तरिय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.