उस्मानाबाद, दि. 30 : कोविड-19 या महामारीच्या अनुषंगाने ऑनलाईन जनजागृती करण्याच्या उद्देशाने उस्मानाबाद पोलीस, उस्मानाबाद नगरपरिषद व पुणे येथील ‘ग्रीनी द ग्रेट’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLScHgyuA9flwl-2h8b7E_JGfBLG3oT3TMAS5JfEttWqhNfAd_w/viewform इंटरनेटवरील या लिंकवर एक प्रश्नमंजूषा उपलब्ध करुन दिली असुन या प्रश्नमंजुषेची योग्य उत्तरे उपयोगकर्त्याने सादर केल्यानंतर त्याच्या इ-मेलवर ऑनलाईन प्रमाणपत्र पोलीस विभागामार्फत प्राप्त होणार आहे. यासंबंधाने आज दि. 30.09.2020 रोजी उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील ‘अलंकार सभागृह’ येथे पोलीस उप अधीक्षक श्री. मोतीचंद राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी नगरपरिषद उस्मानाबादचे मुख्याधिकारी हरीकल्यानम् एलगट्टे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कोविड- 19 जनजागृती संदर्भात कार्य केलेल्या पोलीसांना या प्रसंगी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, पोलीस अधिकारी व नगरपरिषद आरोग्य सल्लागार अमोल गायकवाड उपस्थित होते.
