अचलेर : जय गायकवाड
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील सुपुत्र डॉ.राजू मल्लिकार्जुन माने यांनी उस्मानाबाद जिल्हा महाबीज व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या ऑफिस ला भेट देऊन अचलेर ग्रामस्थांच्या वतीने लोहारा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना शेतीसंबंधी खत,बी-बियाणे यामध्ये अडचण येत असल्यास संपर्क करावा नक्कीच मनामध्ये कोणत्याही प्रकारची कुभावना न ठेवता प्रामाणिकपणे मार्गदर्शन करेन असे डॉ.माने यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी त्यांचे लहान बंधू पृथ्वीराज माने, शरण दुलंगे, सूरज दुलंगे आदी उपस्थित होते.
