अचलेर : जय गायकवाड
शासकीय नोकरीचा एक प्रशासकीय भाग म्हणजे बदली. लोहारा तालुक्यातील अचलेर येथील हुशार व शांत व्यक्तिमत्त्व असलेले राजू मल्लिकार्जुन माने यांनी आज जिल्हा उस्मानाबाद याठिकाणी महाबीज जिल्हा व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला.
बियाणे व्यवसायात अग्रेसर अश्या महाराष्ट्र शासन अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाबीज मध्ये सन २००० पासून राजू माने हे ते कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अकोला,भंडारा व बीड येथे जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
गेल्या चार वर्षांपासून ते बीड येथे कार्यरत होते. अतिशय प्रामाणिक व जबाबदारीने त्यांनी त्याही ठिकाणी आपली सेवा चोख बजावली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

