उस्मानाबाद, दि. 09 : उस्मानाबाद जिल्हयात कोरोबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आज बुधवार दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 258 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 121 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 657 झाली आहे. यातील 4 हजार 869 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 220 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 568 जणांवर उपचार सुरु आहे.