जळकोट : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील चर्मकार विकास संघावर ग्रा.सदस्य संजय अंगुले यांची  तुळजापूर अध्यक्षपदी तर चौफेर कवी सुरज अंगुले यांची युवा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

नळदुर्ग येथील पक्ष कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मारुती बनसोडे (जिल्हाध्यक्ष, वंचित आघाडी ), अंकुश लोखंडे (माजी सैनिक, जिल्हा कार्यकारणी सदस्य) , सौरभ जाधव ,आशिष लोंढे, रविकिरण बनसोडे (जिल्हा कार्यकारणी सदस्य) आदींच्या उपस्थितीत संजय अंगुले यांची चर्मकार विकास संघाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी तर सुरज अंगुले यांची तालुका युवा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार अंकुश लोखंडे  यांनी केले.


 
Top