उस्मानाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव आला.

     मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या  स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती श्रीमती रत्नमाला टेकाळे यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.


 कोरोना संसर्गजन्य साथ रोगाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आज (दि 17 सप्टेंबर 2020) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून  यशवंतराव चव्हाण सार्वजनिक सभागृह मध्ये कोरोना महामारी चा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या नोडल अधिकाऱ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, महिला व बालकल्याण श्रीमती रत्नमाला टेकाळे यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्धा म्हणून यथोचित गौरव केला.

     यामध्ये  शरद पवार हायस्कूल चे सहशिक्षक अनिल निकम,उस्मानाबाद जी. प शिक्षणाधिकारी तथा  प्रचार व प्रसिद्धी मोहिमेचे प्रमुख गजानन सुसर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.जी.केंद्रे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे  कार्यकारी अभियंता दशरथ देवकर,पशुसंवर्धन अधिकारी एन.बी. आघाव बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, उपअभियंता शिंदे,पाणी व स्वच्छता मिशन विभागातील हनुमंत गादगे श्रीमती शोभा टेकाळे,भांडार विभागातील वरिष्ठ सहाय्यक मधुकर कांबळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी  गौरव करण्यात आला.

 
Top