उस्मानाबाद : महेश पाटील

 देशासह राज्यभरात वाढत चालेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी सुरू केलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी या महत्वकांक्षी अभियानास ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.  आवाहनास चांगला प्रतिसाद म्हणून उस्मानाबाद जिल्हा अव्वल असल्याचे उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी बोलताना सांगितले.

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून राज्य शासनाच्या सूचनेनूसार उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती डोअर टू डोअर पणे जाऊन आपले नागरिकांची तपासणी करत आहेत. तसेच जिल्हातील बहूतांश ग्रामपंचायत वर प्रशासक म्हणून नियुक्त होत आहेत. ज्या सरंपचाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी व   सामाजिक संस्थांनी पालकत्वाची भूमिका घेऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या महत्वकांक्षी  अभियानात जागतिक महामारीवर मात करण्यासाठी आत्मविश्वासाने सहभाग घ्यावा, असे उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी तुळजापूर लाईव्ह शी बोलताना सांगितले.

 
Top