नळदुर्ग , दि. 24 :  गोंधळवाडी ता. तुळजापूर येथिल  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवार दि. 23 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बळीराम चौरे, अधिव्याख्याता  इब्राहीम नदाफ, नारायण मुदगलवाड, गटशिक्षणाधिकारी  अर्जुन जाधव, तुळजाभवानी अध्यापक विद्यालय अधिव्याख्याता  अशपाक शेख , सुरतगाव केंद्राचे  केंद्रप्रमुख रमाकांत  वाघचौरे, आपसिंगा केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषिकांत भोसले सर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर 'शाळा बंद शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षक खर्चातून स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आल्या. या भेटीत मान्यवरांनी शाळेची रंगरंगोटी व त्याचे सरंक्षण, प्रयोगशाळा, खेळसाहित्य, घनवृक्ष लागवड , याची पाहणी करून कौतुक केले.

मुख्याध्यापक, शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित विद्यार्थी यांच्या सोबत हितगुज केल्यानंतर विद्यार्थी अतिशय गुणवत्ता पूर्ण आहेत याचेही त्यांना कौतुक वाटले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बाशेवाड, शिक्षक नेते लालासाहेब मगर, व्यंकट तोटावाड, उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय माळी, जयमाला वटणे, मंजुषा, शंकर राऊत, शालेय व्यवस्थापन समितीचे संदीपान मोटे, पोपटराव मोटे आदीजण उपस्थित होते.


 
Top