तुळजापूर : कुमार नाईकवाडी
एकात्म मानवताचे प्रणेते ,कुशल संघटनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शुक्रवार दि. २५ रोजी तुळजापुर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रथम प्रमुख मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, तुळजापुर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे. जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, शिवाजी बोधले, सचिन रसाळ, नारायण नन्नवरे, सुहास सांळुके, मिडीया सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खुरुद, मिडीया सेलचे तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे, गुलचंद व्यवहारे, नानासाहेब डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
