पुणे, दि. 21 : उस्मानाबाद जिल्ह्यातील पोहनेर गावंचे सुपुत्र असलेले डॉ. अभिनव दिलीपराव देशमुख यांनी पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांची सुत्रे स्विकारली. प्रभारी पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते (उपअधीक्षक) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
कोल्हापूर जिल्हयात पोलीस अधिक्षक असताना अभिनव देशमुख यांनी " माझ्या हद्दीत जर कोणी काहीही आगाऊपणा केला, तर त्याचं तंगडे मोडल्याशिवाय राहणार नाही " असं जाहीरपणे अवैध धंदेवाले व त्यांच्या बगलबच्च्यांना ठणकावले होते. मागील दोन वर्षात त्यांनी त्यांनी कोल्हापूर येथे मागील दोन वर्षात अवैध धंद्यांना लगाम घातले होते. त्यांना नुकतेच आंतरिक सेवा सुरक्षा पदकही प्राप्त झाले आहे. आता त्यांची नियुक्ती पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पदी करण्यात आली असून त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे.
अभिनव देशमुख यांचा मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील पोहनेर हा आहे. त्यांचा जन्म दिलीपराव देशमुख या शेतकरी कुटूंबात दि. 2 एप्रिल 1982 साली झाला. वडिलांच्या शासकीय नोकरीमुळे त्यांचे शिक्षण लातुरला झाले असले तरी त्यांची गावाशी नाळ कायम आहे. सन 2009 मध्ये त्यांनी ठाणे ग्रामीणला व साकोली, भंडारा येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले आहे. तर सीआरपी ग्रूप 1 पुणे येथे 2013 -14 ला काम केलं. त्यानंतर सातारा येथे पोलीस अधिक्षक म्हणून 2014-16 व 2016 ते 18 मध्ये गडचिरोली येथे पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर 2018-20 कोल्हापूरला ते पोलीस अधिक्षक होते व आता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

