उस्मानाबाद, दि. 25 : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये खूप अस्वस्थता पसरली आहे. जागोजागी आरक्षणाच्या मागणी साठी मोर्चे आंदोलने होत आहेत. मराठा समाजाने आतापर्यंत 56 मूक मोर्चे काढले, मराठा समाजाचे 50 बांधव ह्या लढ्यात शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार दि. 25 सप्टेंबर रोजी समुद्रवानी ता.जि. उस्मानाबाद येथे रास्ता रोको व गाव बंद पाळण्यात आला. 

आरक्षण हे मिळालेच पाहिजे, त्यासाठी सरकारने सर्व ते प्रयत्न करून मराठा आरक्षण टिकवले पाहिजे. अन्यथा ह्यापेक्षा ही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समुद्रवानीचे अध्यक्ष संदीप कदम, उपाध्यक्ष निखिल घुले, प्रशांत जंगाले, बाळासाहेब ढोबळे, वैभव ढवळे, सुधीर शिंदे, अजिंक्य पवार, गणेश फावडे, सुशील ढोबळे, रोहित शिंदे, अमोल गव्हाणे, बालाजी शिंदे यांच्यासह सकल मराठा समाज समुद्रवाणी यांनी सहकार्य केले.


 
Top