नळदुर्ग, दि. 25 : तुळजापुर तालुक्यातील मानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 25 सप्टेंबर रोजी 'शाळा बंद शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मात्र अनेक मुलांच्या पालकाकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद मानेवाडी शाळेतील वाघमारे ए.व्ही. यांच्यावतीने इयत्ता पहिली  व चौथी वर्गातील विद्यार्थ्याना स्वखर्चाने    स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्यात आले. यावेळी विस्ताराधिकारी (शिक्षण) शोभा राऊत, केंद्रप्रमुख दत्तात्रय आलुरे यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थित होते.


 
Top