तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तीर्थक्षेत्र तुळजापुर शहरासह नळदुर्गला पाणीपुरवठा करण्यात येणारा नळदुर्ग येथील बोरी धरण शंभर टक्के भरला आहे. त्या पार्श्वभूमीवर तुळजापुरचे नगराध्यक्ष सचिन यांनी रविवारी बोरी धरणातील जलाशयाचे पुजन केले.
तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे तुळजापुर शहरासाठी पाणी पुरवठा करणारे नळदुर्ग येथील बोरी धरण १००% पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच जुन्या काळात पाणी पुरवठा करणारे लातुर रोडवरील पांचुदा तलाव ही पुर्ण क्षमतेने १००% टक्के भरल्यामुळे सदरील दोन्ही धरणावर ची पातळी १०० टक्के पुर्ण झाली असल्यामुळे येणाऱ्या काळात तुळजापुर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी दोन वर्षासाठी संपुष्टात आल्यामुळे सदरील या दोन्ही धरणाच्या साठ्याचे जलपुजन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले.
यावेळी तुळजापुर न.प.चे कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, पाणी पुरवठा विभाग प्रमुख अर्जुन माने, महादेव शिंदे, हणमंत पुजारी, समाधान जगताप, किरण औताडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होती.
