तुळजापूर, दि. 27 : विश्वास काका इंगळे विचार मंच व रणजित भैया इंगळे मित्र मंडळाच्या वतीने यांच्याकडून प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व जनतेसाठी वाफेची मशीन व रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्या चे वाटप काँग्रेसचे नेते रणजित इंगळे, युवक नेते आनंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी काँग्रेस नेते आनंद जगताप, महेश अणदुरकर, राहुल शिंदे, संदीप कदम, अमोल कदम, गणेश अणदुरकर, केदार पांढरे, नवनाथ पांढरे, मयूर शिंदे, लसू कदम, सिद्धू शेरकर, भैया शिंदे, गणेश इंगळे, बब्बू इंगळे, वैभव इंगळे, लखन इंगळे, मनोज राजपूत, संदीप कदम, कै विश्वासकाका इंगळे विचार मंचाचे सर्व सभासद उपस्थित होते.
काँग्रेस नेते रणजित इंगळे यांनी प्रभाग 8 मधील नागरिकांना कोरोना साथीच्या अनुषंगाने घराच्या परिसरातील स्वच्छता ठेवून तसेच बाहेर पडल्यानंतर मास्क वापरण्यास या सूचना केल्या शक्यतो गर्दीमध्ये जाऊ नका कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा महत्त्वाच्या सूचना दिल्यानंतर नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे याप्रसंगी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते आनंद जगताप यांनी शहरातील नागरिकांनी खबरदारी घेण्यासाठी गाफील राहू नये प्रत्येक माणसाने स्वतःची काळजी केल्यास शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मोठी मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगावी असे आवाहन केले.
