नळदुर्ग : एस.के.गायकवाड
उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील सरपंचासह अनेकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामग्रहात रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात वडगाव (सिद्धेश्वर) येथील सरपंच संपत जानराव यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष नागपाल चौधरी, जिल्हा सचिव सचिन शिंगाडे,रिपाइं कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष, गौतम का़ंबळे,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे ,उस्मानाबाद शहराध्यक्ष उदयनराज बनसोडे,शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे, तुळजापूर शहराध्यक्ष अरूण कदम,सह कार्यकर्ते उपस्थित होते.
