उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा शहराजवळील ञिकोळी रोड लगत शेताच्या बांधांवर मोटारसायकल सोडून शेतात काम करणा-या एका शेतक-यांची गाडी दगडधानोरा येथील एका आरोपीने चोरून पोबारा केल्याची  घटना तीन दिवसापूर्वी घडली होती उमरगा पोलीसांनी तपास गतीने करीत आरोपी सह त्याच्या ताब्यातील पाच मोटारसायकल ताब्यात घेतल्याची घटना गुरूवार दि. 24 रोजी सायंकाळी घडली आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शहरातील बालाजी नगर परिसरात राहणारे प्रविण शिरगुरे यांनी त्यांचे शेतजमीन ञिकोळी रोड लगत आहे. ते मंगळवार दि.22 रोजी दुपारी मोटारसायकल शेत बांधांवर सोडून शेतात काम करीत होते. अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल क्रमांक MH 25 AC 3444 चोरून पोबारा केला होता ती तक्रार उमरगा पोलिसांत केले होते. त्या तक्रारीची दखल घेत तपासचक्र वेगाने फिरवीत दगड धानोरा येथील आकाश देवीदास लोखंडे ताब्यात घेवून विचारपूस करताच त्याने मोटारसायकल चोरल्याचे कबूल केला व अजून मोटारसायकल चोरल्याची माहिती पोलिसांना दिली. 

यात MH 12 LG 6942, MH 12 CQ 3508, MH 20 AJ 9388, MH 24 Z 9739 यासह MH 25 AC 3444 ह्या पाच मोटारसायकल जप्त केले आहेत.

ही कामगीरी उमरगा येथील पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोहेकॉ. कामतकर, पोना. शिंदे, पोकॉ. भोसले, दिवे, कांबळे, चालक चंद्रकांत गायकवाड यांनी मोलाची कामगिरी पार पाडत चोरट्याला गजाआड केले.

 
Top