उमरगा : लक्ष्मण पवार
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाक्त राज्याभिषेक दि. 24 सप्टेंबर रोजी उमरगा येथील छ. शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उमरगा मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या अभिवादन करुन साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने करवून घेतला होता . या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात . मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव भास्कर वैराळे यांनी छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या राज्याभिषेक दिनाची माहीती व महत्व सांगितले .
या वेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव भास्कर वैराळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप भोसले, नेताजी जाधव जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा माने, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता रेखा सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड ता.सचिव मंजुषाताई चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड माजी तालुका सचिव मीरा चव्हाण आदी उपस्थित होते.
