उमरगा : लक्ष्मण पवार

उमरगा तालुक्यातील कदेर गावाचा मुख्य रस्ता खड्डेमय झाला असून बससेवा, प्रवाशी वाहतुक सह दुचाकीवर प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना कमर दुखीचा त्रास, रात्रीच्या वेळी गाडी चालवणे अवघड झाले आहे.

कदेर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असून देखील या रस्त्याची अवस्था चाळणी सारखी झाली आहे. कदेर पाटी ते कदेर रस्त्यावरून मुरळी, कंटेकूर, कोथळी, आनंदनगर, व्यंकटेश नगर, सरदार नगर, सेवा नगर, मार्गे मुरूम व कर्नाटकातील गदलेगांव, अंळगा,शिरूर या मार्गास जोडले जाते. तरी केवळ या रस्त्याच्या दुरावस्थे मूळे भुसनी मार्गे मुरूम प्रवास करावा लागत आहे. आता शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी व पुन्हा पेरणी साठी या मार्गावरून मुख्य बाजारपेठ उमरगा व मुरूम जावे लागते पण रस्ता खराब असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

कदेर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण असून देखील या रस्त्यावर खासदार, आमदार, स्थानिक नेते, पुढारी अधिकारी, कर्मचारी वर्ग ये-जा करतात तरी देखील यापैकी कोन लक्ष देणार का? असा सवाल जनतेतूनव नागरिकांतून होत आहे.

खड्ड्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. उमरगा ते गुलबर्गा रस्त्यापासून कदेर गावापर्यंत साडेचार किलोमीटर रस्त्या वर मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रवाशी व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय या रास्तावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे,आणि रास्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहन सहजा सहज पास होऊ शकत माहीत  एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात जावे लागत आहे.


"जेणेकरून हा रस्ता लवकरात दुरुस्त, अथवा नवीन मंजुरी देऊन नाहक होणारा जनतेला त्रास कमी करण्यात यावा"

- विजयकुमार रामराव राठोड, ग्रामपंचायत सदस्य, कदेर

 

"याविषयी जिल्हा परिषद, व प्रधानमंत्री सडक योजना यांच्या प्रतिनिधी फोन द्वारे बोलणे झाले आहे. तरी पीएमजेएसओ अंतर्गत टप्पा 3 मध्ये आहे. मंजुरी मिळणे ऑनलाईन झाल्यामुळे थोडी अडचण येत आहे."

- सौ.डॉ.शालिनी विक्रम जीवनगे, जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद


 
Top