तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शिवेसेनच्यावतीने संसर्गजन्य कोरोनाच्या काळात एका योध्दा करणा-या महाराष्ट्र पोलीसांच्या मदतीसाठी तुळजापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी सॅनिटायझर स्टॅंड भेट देण्यात आले.
यावेळी स.पो.नि शरदचंद्र रोडगे, तुळजापूर शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम, उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख स्वरूप कांबळे, समाधान ढवळे उपस्थित होते.
