तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शिक्षक दिनानिमित्त लोकमंगल मल्टीस्टेट आणि लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने तुळजापूर विभागात येणाऱ्या सर्व शाळांतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
आमदार सुभाष देशमुख व लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन रोहन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याकारणाने साध्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तुळजापुरातील श्री तुळजाभवानी महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे नुतन संचालक सचिन आरगडे यांनी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांमुळे मनुष्य घडतो. शिक्षक हा मनुष्याचा पहिला गुरू आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी रामकृष्ण तांबे, पद्मसिंह भुमकर, सुनील साळुंके, विनोद देवकर, सचिन माने, शंकर क्षीरसागर, सुदर्शन सुतार आदी उपस्थित होते.
