नळदुर्ग, दि. 5 : शहरात उभे केलेले विजेचे पोल सीमेंट कॉन्क्रीटने मजबूत करावे, या मागणीसाठी येथील महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नळदुर्ग शहरात  विविध ठिकाणी महावितरणच्या वतीने जवळपास शंभर विजेचे पोल उभे केले आहेत. ते उभे करीत असताना सीमेंट कॉन्क्रीट न करता तसेच उभे केले आहेत. यावर मनसेनी आक्षेप घेऊन वारंवार निवेदन दिले. पण या विषयाकड़े दुर्लक्ष करण्यात आल्याने व महावितरणच्या निष्काळजीपणा मुळे भविष्यात धोका निर्माण होउ शकतो व विजेचा खोळबा होऊ शकतो म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.

आठ दिवसात सर्व विजेचे पोल सीमेंट कॉन्क्रीटने मजबूत करावे, अन्यथा दि. 14 सप्टेंबर रोजी टाळे ठोका आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सुरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे आदिजण उपस्थित होते.

 
Top