उस्मानाबाद, दि. 05 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 200 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर गेल्या चोवीस तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 42 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 769 झाली आहे. यातील 4 हजार 352 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 202 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 215 जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
