काटी, दि. 11 : केमवाडी ता. तुळजापूर येथील येथील मनमिळाऊ, सुसंस्कृत, सांप्रदायिक क्षेत्रातील नामवंत तथा प्रगतशील शेतकरी सुुखदेव बाबुराव काळेे (देेेेशमुख) वय (85) यांचे दीर्घ आजाराने गुरुवार दि. 9 रोजी रात्री साडे अकरा वाजता निधन झाले. ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, एक मुलगी,जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दि. 12 ऑगस्ट रोजी सुखदेव काळे यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. त्यांना त्याच दिवशी तुळजापूर येथील सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता काही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना 124 तुळजापूर येथील विलीनीगिकरण कक्षात पाठवण्यात आले. मात्र ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांचे चिरंजीव ॲड. अनिल काळे यांनी त्याचदिवशी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गेल्या 26 दिवसापासून ते अतिदक्षता विभागात ऑक्सिजन वर होते. परंतु या कोरोनाशी लढाई करताना झुंज अखेर अयशस्वी ठरली व त्यांना देवाज्ञा झाली. एक सधन शेतकरी, अत्यंत मनमिळाऊ व सांप्रदायिक क्षेत्रातील पंचक्रोशीतील नामवंत व्यक्ती हरपल्याने पसिरात हळहळ केली जात आहे. तर अनेक ठिकाणी त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.