उमरगा : जय गायकवाड
उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर शाळेने लोकवाटा याच्या माध्यमातून शाळेचा कायापालट केलेला आहे. तसेच वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत, यामुळे ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून राज्य स्तरावर नावाजली जात आहे.
या शाळेतील उपक्रमशील शिक्षक उमेश रघुनाथ खोसे हे स्वतः तंत्रस्नेही शिक्षक असून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्या कोरोणाच्या काळामध्ये मुलांना प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य नाही यासाठी त्यांनी रोज सकाळी व्हाट्सअप ग्रुप व साध्या टेक्स्ट मेसेज द्वारे अभ्यास पाठवून तो अभ्यास व्हाट्सअप वरच तपासला जातो.तसेच मुलांचा झूम अँप गुगल अँप तसेच इतर साधनांच्या साह्याने ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले आहे. 25 मार्चपासून एकही दिवस त्यांची शाळा बंद नाहीये. इतकेच नव्हे तर त्यांनी यावर्षी 1 मे रोजी मुलांना प्रत्यक्ष निकाल देणे शक्य नसल्याने शाळेची स्वतःची वेबसाईट स्वतः बनवून त्यावर एक मे रोजी ऑनलाईन निकाल जाहीर केलेला आहे. असा निकाल जाहीर करणारे जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
शाळेच्या विकासामध्ये गावातील शिक्षणप्रेमी नागरिक तसेच पालक यांचा खूप मोलाचा वाटा आहे, यासोबतच शाळा निसर्गरम्य ठेवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम पुजारी यांनी शाळेत वृक्षारोपण करून ते जगवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. यात मुलेही व सर्व शिक्षक आनंदाने सहभागी होतात. आज शाळेसमोर 40 झाडे आनंदाने डोलत आहेत. यासाठी शाळेतील स्वयंपाकी ताई गोलमाल रणखांब यांचेही मोलाचे योगदान लाभत आहे.
मागील दोन वर्षांमध्ये शाळेने वेगवेगळे उपक्रम राबवून शाळा उपक्रमशील शाळा असल्याचे सिद्ध केले आहे. यामध्ये गतवर्षी त्यांनी शिक्षण संस्कार शिबिर हा एक अनोखा उपक्रम राबवून केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हा उपक्रम अनोखा ठरला आहे, केवळ सहशालेय उपक्रमच नव्हे तर मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी शाळा सतत प्रयत्नशील असते. गतवर्षी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये या शाळेच्या विद्यार्थी तालुक्यातून दुसरा व जिल्ह्यातून पाचवा आलेला होता. तसेच या शाळेतील मुले, टॅब, अँड्रॉइड टीव्ही व संगणकाच्या माध्यमांतून शिक्षण घेत आहेत. त्यासोबतच मुलांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी उमेश खोसे सतत प्रयत्नशील असतात, मुलांना कलेतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनोखे उपक्रम राबविले आहेत. शाळा निसर्गरम्य तर बनली आहे, पण या निसर्गरम्य वातावरणामध्ये मुलांना अवांतर वाचनाचा आनंद घेता यावा म्हणून यांनी डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण केला असून मुले तिथे अवांतर वाचनाचा आनंद घेतात. तसेच मुलांना शाळेत कृतीयुक्त शिक्षण मिळावे यासाठी वेगवेगळे साधनांची निर्मिती शाळेच्या वतीने करण्यात आलेले आहे.अशा या उपक्रमशील शाळेचा गौरव सर्वत्र होत आहे आजच्या शिक्षक दिनी अशा उपक्रमशील शिक्षकांना सलाम....!!!!
